आडेली दाभाडी रस्त्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते भूमीपूजन

2

वेंगुर्ले : ता.७
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली दाभाडी रस्त्यासाठी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांनी जिल्हा नियोजन मधून पाच लाख रुपये निधी मंजूर केला. सदर रस्त्याचे भूमीपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख यधवांत उर्फ बाळू परब, माजी सरपंच प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष कासले, प्रभाकर गावडे, विलास गावडे, राजन नार्वेकर, संजय नार्वेकर, भगवान गावडे, राजाराम सावंत, मदन नार्वेकर, सुधा गावडे, चंद्रकांत नार्वेकर, अर्जुन नार्वेकर, राजन परब आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

14

4