जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय नरे यांची निवड…

2

जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय नरे यांची निवड…

मालवण, ता. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित या संस्थेच्या अध्यक्षपदी संजय गंगाधर नरे यांची तर उपाध्यक्ष पदी अंतोन किस्तू मेंडीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित या संस्थेच्या
अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा मालवण भरड येथील हॉटेल विश्वभारती येथे संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी
अध्यासी अधिकारी ए. एल. हिर्लेकर होते.
यावेळी संजय नरे, अंतोन मेंडीस, गोविंद चव्हाण, विजय फाटक, उमेश चव्हाण, हनुमंत लुडबे, शशिकांत देऊलकर, मनोहर कामतेकर, चंद्रशेखर मांजरेकर, यशवंत चव्हाण आदी संचालक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय नरे आणि उपाध्यक्ष अंतोन मेंडीस यांचे अभिनंदन करण्यात आले.

10

4