पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक ठप्प
वैभववाडी.ता,८: राज्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमशान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री पासून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीत येथे पुराचे पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बॕटींग केल्याने गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग पाण्याखालीच राहणार आहे.