असनिये-घारपी मार्गावर पुन्हा दरड कोसळली…

204
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओटवणे.ता,८: मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दरड कोसळली आहे.कोसळलेली दरड मोठी नसली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडीचा मोठा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.यापूर्वी याच ठिकाणी भली मोठी दरड कोसळून असनिये घारपी मार्ग पंधरा दिवस बंद होता.तर दरडी लगतच्या कणेवाडी ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले होते.

गेले दोन दिवस ओटवणे दशक्रोशीत मुसळधार पाऊस कोसळत असून, असनिये-घारपी मार्गावर दरडीचा छोटा भाग रस्त्यावर आला आहे.दरडी नजीक असलेले भले मोठे झाडही उन्मळून पडले आहे.तर जोरदार पावसाने दरडीच्या मध्यभागी पुन्हा एकदा पाणी प्रवाहित झाले असून,पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडीचा मोठा भाग पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही याच ठिकाणी भली मोठी दरड कोसळली होती.प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करत दरडीचा काही भाग हटवून रस्ता वाहतुकीस योग्य केला होता.त्यामुळे ऐन चतुर्थीत घारपीवासियांसाठी एस. टी. बस सेवा सुरू झाली होती.

\