कणकवलीच्या धावपटू ने लडाख जिंकले…

2

कणकवली.ता,८:  तालुक्यातील जानवली गावचा धावपटू अथर्व राजनिष राणे याने आज लडाख जिंकले.लेह येथे दरवर्षी लडाख आंतरराष्ट्रीय मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत यंदा अथर्व राणे याने सहभाग घेतला आणि २१ किलोमीटर चे अंतर फक्त २ तास ५० मिनिटांत पूर्ण केले. या यशाबद्दल त्याला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
जगातील सर्वात उंचावर ( समुद्रसपाटीपासून १४००० फूट) होणारी ही एकमेव मॅरेथॉन असून यात जर्मनी, फ्रान्स, यूके, अमेरिका आदी देशातील धावपटू सहभागी झाले होते.अथर्व राणे याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. तो परेल मुंबई येथील नारायण मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्थेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

13

4