कुडाळ ता.०८: येथील प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग राजाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,पत्नी नीलम राणे,माजी खासदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई,जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली,कुडाळ स्वाभिमान तालुका अध्यक्ष विनायक राणे,माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम,आनंद शिरवलकर,कुडाळ शहर अध्यक्षा रेखा काणेकर,रेवती राणे,पावशी माजी सरपंच पप्या उर्फ श्रीपाद तवटे, नगरसेवक सुनील बांदेकर, स्वरूप वाळके,भूषण राणे, अनिल कुडपकर,राकेश नेमळेकर,तसेच सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.