गगनबावडा कोल्हापूर मार्ग अद्यापही ठप्प

185
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग

वैभववाडी ता.०८गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे आज सकाळी रस्त्यावर पूराचे पाणी भरल्याने कोल्हापूर गगनबावडा मार्ग अद्यापही ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
अॉगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी येवून अनेक वेळा कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे अद्यापही या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.

\