झरेबांबर-मांगेली पुलावर मोठे भगदाड;अपघाताची शक्यता…

2

दोडामार्ग ता.०८: झरेबांबर-मांगेली येथील पंतप्रधान ग्रामसडक रस्त्यांला झरेबांबर पुलावर मोठे भगदाड पडले असुन याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.या रस्त्यांवरुन मांगेली,खोक्रल,उसप,पिकुळे आदी गावात वाहतूक होते.
या पुलावर वळणे असुन भगदाड चुकविण्यास गेल्यास वाहन थेट नदीत पडुन अपघात होऊ शकतो.गणेशचतुर्थी पुर्वी भगदाड पडले होते.त्यावेळी डागडुजी करण्यात आली होती.पंरतु अतिवृष्टिमुळे पुलावरुन पाणी जात असल्याने त्या ठिकाणी पुन्हा मोठे भगदाड पडले आहे.तरी संबंधित विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

14

4