वडाचापाट ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश…

271
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ८ : वडाचापाट नवपाटवाडीतील ग्रामस्थांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्याने प्रेरित होऊन भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
केंद्र सरकार व राज्य शासनाचा येणार्‍या योजना ग्रामपंचायत राबवण्यास असमर्थ ठरली आहे. जिल्हा नियोजन सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शांतादुर्गा मंदिर सुशोभीकरण, संरक्षक भिंत, पाचशे मीटरचे दोन रस्ते, खडीकरण, डांबरीकरण मंजूर करून घेत कार्यान्वित केले. गावात झालेल्या विकासकामांमुळे नवपाटवाडीतील ग्रामस्थांनी प्रेरित होत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी सर्वसामान्य ग्रामस्थांना जनतेच्या हिताच्या योजनांची माहिती देण्यात आली. सर्व योजना वाडी वाडीमध्ये पोचविण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी महेंद्र हडकर, केतन पाटकर, साबाजी हडकर, जयराज हडकर, संतोष हडकर, हनुमंत कोचरेकर, कमलेश मांजरेकर, नयन मांजरेकर, उद्धव पाटकर, विजय पाटकर, दिलीप पाटकर, एकनाथ पाटकर, भालचंद्र कोचरेकर, शरद पाटकर, प्रकाश मांजरेकर, विश्वनाथ पाटील, चंद्रकांत हडकर, संदीप पाटकर, नीलेश मांजरेकर, संकेत पाटील, चंद्रकांत पाटील, मानसी हडकर, पूजा पाटकर, श्रद्धा हडकर, कविता मांजरेकर, दीक्षा मांजरेकर, सुलोचना पाटकर, उज्ज्वला पाटकर, योगिता पाटील, श्रद्धा हडकर, ऊर्मिला पाटकर, भारती पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी मामा बांदिवडेकर, आशिष हडकर, सुहास सावंत, महेश पालव, समीर गावडे, दत्ताराम पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\