मांडवी एक्सप्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त…

2

स्टेशन मास्तरांना घेराव; खेड रेल्वेस्थानकावरील प्रकार…

रत्नागिरी ता.०८: मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचे दरवाजे काही प्रवाशांकडून आतून बंद करण्यात आल्यामुळे अनेक प्रवाशांना आगाऊ बुकिंग करून सुद्धा गाडी सोडावी लागली.दरम्यान या रागातून संतप्त झालेल्या खेडमधील प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला.
आम्ही बुकिंग केले होते.मात्र आधीच गाडी फुल असल्यामुळे प्रवाशांत डबलचे दरवाजे उघडले नाही त्यामुळे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी प्रवाशांनी जोरदार गोंधळ घातला.त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली.अखेर आक्रमक प्रवाशांना शांत करण्यासाठी हॉलिडे एक्सप्रेस मधून त्यांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याचे तेथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मात्र या सर्व परिस्थिती प्रवाशांकडून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.

6

4