मांडुकलीत पाण्याच्या पातळीत वाढ

2

गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्पच; रस्त्यावर पाणी ६ फूटांनी वाढले,धरणातून पाण्याचा विसर्ग

वैभववाडी/पंकज मोरे

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. शनिवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्त्यावर आज सायंकाळी सहा ते सात फूटांनी पूराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत पाणी कमी होणार नसल्याने करुळ घाटमार्ग बंदच राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.
अॉगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी येवून अनेक वेळा कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आले आहे. आज सायंकाळी पाण्याची पातळी सहा ते सात फुटांपर्यंत पोचली आहे. उद्या दुपारपर्यंत पाणी कमी होणार नसल्याने करुळ घाटमार्ग बंदच राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.

1

4