किल्ले भाड्याने देण्याच्या शासन निर्णयात वेंगुर्ल्यातील “निवती”चा समावेश

257
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अर्चना घारें: इतिहासाची क्रूर चेष्टा थांबवा,अन्यथा आंदोलन

वेंगुर्ले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्यातील गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे, त्यामध्ये वेंगुर्ले येथील ‘निवती’ या किल्ल्याचा देखील समावेश आहे. या बाबत अर्चना घारे परब यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना वैभवशाली इतिहास आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून कणखर असे गड किल्ले स्वराज्याची साक्ष देतात. हे गडकिल्ले केवळ इतिहास नसून ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत, आमची ओळख, आमचे अस्तित्व आहे. असे असतांना ते भाड्याने देणाचा विचार तरी कसा केला जाऊ शकतो. शिवछत्रपतींचे नाव घेत सत्तेत आलेल्या या सरकारला छत्रपतींच्या आशीर्वादाचा फार लवकर विसर पडलेला दिसतोय. गड किल्ले जतन करायचे असतील तर अनेक पर्याय आहेत, त्यासाठी लोकसहभाग वाढवता येईल परंतु भाड्याने देऊन पैसे उभे करणे आणि त्यातून जतन करणे असे म्हणणे म्हणजे इतिहासाची क्रूर चेष्टा आहे. आणि वास्तू भाड्याने देऊन कोणत्या वास्तूंचं महात्म्य टिकलं आहे? राज्याची सांस्कृतिक ओळख विकण्याची वेळ या महाराष्ट्रावर आली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे कधीही होऊ देणार नाही. आपल्या अस्मिता, आपली ओळख विकायला हा महाराष्ट्र कोणाच्या दावणीला बांधलेला नाही हे सरकारने लक्षात ठेवावं असेही अर्चना घारे परब यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितले आहे.

\