गगनबावडा कोल्हापूर मार्वगारील वाहतूक तब्बल सहा तासांनी सुरळीत

2

 

मांंडुकलीत रस्त्यावर भरलेले पाणी ओसरले; पहाटेपासून वाहतूक पूर्ववत

वैभववाडी/पंकज मोरे

गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रविवारी सकाळी रस्त्यावर पूराचे भरलेले पाणी ओसरले असून तब्बल सहा तासांनी वाहतूक पूर्ववत झाली आहे. रविवारी सायंकाळपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी पहाटेपासून गगनबावडा कोल्हापूर मार्ग पूर्ववत झाला आहे.
गेल्या एक आठवड्यापासून कोकणसह घाटमाथ्यावर धो-धो पाऊस कोसळत आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आले होते. धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रविवारी दिवसभर रस्त्यावर पाच ते सहा फुटांवर पाण्याची पातळी वाढली होती. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने मांडुकलीत रस्त्यावर पुराचे आलेले पाणी कमी झाले आहे. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून गगनबावडा कोल्हापूर मार्ग वाहतूकीस सुरळीत करण्यात आला आहे.

11

4