आंबोलीत यावर्षी पावसाने जगाचे रेकॉर्ड मोडले

699
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.८; जगात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी यावर्षी झाला आहे.येथे तब्बल ८५७५ मी.मी.एवढा पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे.तसेच वर्षा पर्यटनासाठी आणि येथील धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.पावसाळ्यातील गारवा,येथील धुके,मुसळधार पाऊस आणि धबधबे पाहण्यासाठी ,धबधब्यांखाली डुंबण्या साठी येथे देशभरातून पर्यटक येत असतात.पावसाळ्यातील सुट्टीच्या दिवशी तर हजारो पर्यटकांची मांदियाळी आंबोलीत असते.त्यामुळे पावसाळ्यातील मजा लुटण्यासाठीची आंबोलीची क्रेझ तरुणाईला भुरळ घालते आहे. अरबीसमुद्राच्या बाजूला पश्चिम भारतातील सह्याद्रीच्या पर्वतावरील आंबोली हे भारतातील पावसाचे अग्रगण्य ठिकाण आहे.तसेच थंड हवेचे ठिकाण आहे. येथे राज्यात सर्वाधिक पाऊस होतो.येथे यावर्षी ३४३ इंच(८५७५) इतका पाऊस झाला आहे.जगातील पाऊस सर्वात जास्त मेघालयातील मौसिनराम येथे पडतो. येथे ८ हजाराच्या वर पाऊस पडतो .मात्र 2 वर्षे हे प्रमाण खूप कमी झाल आहे.यावर्षी तेथे ६२१८ मी.मी.एवढा पाऊस झाला.त्याखालोखाल चेरापुंजी हे ठिकाण आहे.येथे साधारण ८महिने पाऊस पडतो.यावर्षी तेथे ६१०० मिमी इतका पाऊस झालाय. त्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील महाबळेश्वरला ७२०० मी मी एवढा पाऊस झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली याठिकाणी मात्र यावर्षी तब्बल ८५७५ मी.मी. एवढा पाऊस झाला अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.हे रेकॉर्ड सध्या जगात एक नंबरला आहे.त्यामुळे आंबोलीत पावसाचा विक्रम यावर्षी झालाय.नैऋत्य मोसमी वाऱ्याबरोबर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या सर्वाधिक उंच टेकडीवर ढग आंबोलीत अडले जातात त्यामुळे येथे पावसाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.या वर्षी साधारण २१ जून नंतर चांगला पाऊस झाला
जून मध्ये ४० इंच असणारा पाऊस जुलै महिन्यात सुरवातीला थोडी विश्रांती घेतली होती. २९ जुलै नंतर मुसळधार कोसळला.१० दिवसात दमदार रेकॉर्ड बनवले.४ऑगस्ट ला १७ इंच (४२५) मी.मी. एवढी नोंद झाली.यावर्षी कमी वेळात जास्त पाऊस झाला.दर वर्षी येथे ३०० इंचापेक्षा जास्त पाऊस होतो ,२० वर्षपूर्वी ही आकडेवारी ४०० ते४५० इतकी होती.