सावंतवाडीत उद्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन

2

सावंतवाडी.ता,९: येथील कुटी रुग्णालयाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन उद्या आयोजित करण्यात आले आहे.यासाठी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.सावंतवाडी तालुक्यातील लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी येथील उपजिल्हा दर्जाच्या रुग्णाला मल्टी स्पेशलिस्ट चा दर्जा देण्यात आला आहे.त्यासाठी ३६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्या या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

11

4