Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"मी" सोबत नसतो,तर....केसरकर मंत्री दिसले नसते...

“मी” सोबत नसतो,तर….केसरकर मंत्री दिसले नसते…

बबन साळगावकर:राणेंचा प्रवेश रखडण्यास केसरकरांचीच जादू जबाबदार…

सावंतवाडी ता.०९:  मी सोबत नसतो तर पालकमंत्री दीपक केसरकर आज मंत्री म्हणून दिसले नसते,आता मात्र त्यांचा पराभव निश्चित आहे,असा दावा सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.माझ्याशी ४ ऑगस्टला झालेली भेट ही केसरकरांचे षंडयंत्र होते.ती वेगळी एक जादू होती त्याचा परिणाम आजही मला भोगावा लागत आहे.त्याच्या मुळेच राणेंचा पक्ष प्रवेश रखडला ही वस्तुस्थिती आहे.एका बाजूने आपले म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने घात करायचा ही केसरकरांची जूनी खेळी आहे,मात्र याला मी घाबरणार नाही असेही साळगावकर यावेळी म्हणाले .

त्यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते म्हणाले,पालकमंत्री केसरकर यांची व माझी ४ ऑगस्टला झालेली भेट हे षंडयंत्र होते.त्या भेटीचे परिणाम मी आज पस्तीस दिवस भोगत आहे.ते एक जादुगार आहेत.दोन दगडात मतभेद नसतात ते सजीवात असतात पण त्यांनी नेहमी चुकीच्या शक्तीचा वापर केला.त्यांचे देव परग्रहावरचे आहेत,असा ही टोला साळगावकर यांनी मांडला.
ते पुढे म्हणाले त्यांनी चांगले काम केले असते तर लोक आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहीलो असतो.पण फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी आपली नाती जपण्याचा दिखावूपणा केला.या त्यांच्या त्रासातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे सुद्धा सुटले नाही त्यांचा पक्ष प्रवेश रखडण्यास केसरकर जबाबदार आहेत.या पुढे काही झाले तरी मी त्यांच्या विरोधात बोलत राहीन.प्रसंगी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे.त्यासाठी राष्ट्रवादीशी माझी बोलणी सुरू आहेत,असे साळगावकर म्हणाले.
पालकमंत्री केसरकर आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत.पालिकेत आयोजित एका बैठकीत माजी नगराध्यक्ष आनारोजीन लोबो यांनी एका बैठकीत शहरात सुरू असलेल्या बेकायदा धंदया बाबत लक्ष वेधले होते याचे शूटिंग केले म्हणून त्यांनी पत्रकारावर दबाव आणण्याचे काम केले.नेहमी दहशतवादा वर बोलणाऱ्या केसारकरांचा हा सर्व प्रकार म्हणजे नवा दहशतवाद नाही का ?असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments