Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या नावावर इमारतीचे सांगाडे नको...

मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या नावावर इमारतीचे सांगाडे नको…

मंगेश तळवणेकर:आणखी कीती वर्षे “बांबुळीची वारी” सुरू राहणार…

सावंतवाडी ता.०९: मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या नावावर पालकमंत्री दीपक केसरकर नुसता इमारतीचा सांगाडा उभा करून नेमके काय साध्य करणार आहेत.मंजूर करण्यात आलेले ३५ कोटी नुसते बांधकामावर खर्च न करता आधुनिक मशीनरीसाठी खर्च करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी आज येथे केली.आचारसंहितेच्या तोंडावर उद्घाटन व भूमिपूजन करून केसरकर लोकांची दिशाभूल करत आहेत,उदया भूमिपूजन होणारी इमारत तयार होण्यासाठी पाच वर्षे लागणार आहेत.तो पर्यंत बांबुळीची वारी सुरूच राहणार का? असा प्रश्न सुध्दा तळवडेकर यांनी केला आहे.
मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे उद्घाटन उद्या होत आहे.या पार्श्वभूमीवर श्री तळवणेकर यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून आपली भूमिका मांडली.ते म्हणाले उद्या होणारे भूमिपूजन हे केवळ दिखाऊपणा हे पालकमंत्री केसरकर यांनी जी रक्कम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मंजूर केली आहे त्या रकमेत फक्त इमारतीचा सांगाडा उभा केला जाणार आहे त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी ची किंवा डॉक्टरची तरतूद कोणत्या प्रकारे करण्यात आले नाही.तुर्तास मंजूर करण्यात आलेल्या रकमेत उभारण्यात येणारी इमारत तयार करण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा कालावधी उलटणार आहे. त्यानंतर नेमके काय होईल याचा अद्याप थांबता नाही.त्यामुळे इमारत बांधण्यासाठी वापरण्यात येणारी ही रक्कम पालकमंत्री केसरकर लोकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मशिनरी खरेदी करण्यासाठी करावी. तसेच सध्यस्थितीत असलेल्या इमारतीत आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करून द्यावी असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments