कुडाळ ता.०९: मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कुडाळ-मालवण तालुक्यातील तीन रुग्णांना आजारावर उपचार घेण्यासाठी दीड लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली आहे.
यामध्ये कुडाळ तालुकयातील मांडकुली येथील प्रतीक्षा भरडकर, यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी ५० हजार, मालवण वायंगणी येथील सुभाष बाबू वायंगणकर यांना मेंदूच्या आजारावरील उपचारासाठी ५० हजार, कुडाळ शहरातील श्रीक्रिष्ण महादेव शिरसाट यांना मेंदूच्या आजारावरील उपचारासाठी ५० हजार,रु आर्थिक मद्त आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिली आहे.
गरीब गरजू रुग्नांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हि योजना असून आमदार वैभव नाईक यांनी आत्तापर्यत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० रुग्नांना २ कोटी पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक मदत केली.
आमदार नाईकांच्या प्रयत्नातून कुडाळ-मालवणातील तीन रुग्णांना आर्थिक मदत…
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4