बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वेदिका पेडणेकरची निवड…

150
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग,ता.१२: अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन येथे बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वेदिका दिपक पेडणेकर हिची निवड झाली आहे. वेदिका ही सावंतवाडी तालुक्यातील माजगाव-कुंभारवाडीतील रहिवाशी आहे. वेदिकाचे वडील दिपक पेडणेकर सध्या रायगड जिल्हा परिषद मध्ये इंजिनिअर असून रोहा येथे कार्यरत आहेत. वेदिकाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

देशभरातील ९० हजार विद्यार्थ्यांमधून सिंधुदुर्गातील कुंभार समाजातील सुकन्येची निवड झाल्याने तीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टीट्युड ऑफ डिझाईन शिक्षण संस्थेत ४८० जागांसाठी देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थीनी अर्ज केला होता. या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. डिझाईन संबंधित पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत वेदिका पेडणेकरची निवड झाली. त्यानंतर डिझाईन संबंधित केलेले काम, वेगळा दृष्टिकोन याबाबतचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. त्यानंतर मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये वेदिका पेडणेकर या विद्यार्थिनीने यश संपादन केले. या विदयार्थीनीची निवड अहमदाबाद येथे युनाटेड वर्ल्ड इन्स्टीट्युड ऑफ डिझायन या संस्थेत झाली असून हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे.

डिझायनबाबत वेगवेगळ्या प्रकारचे धडे या चार वर्षात घेतले जाणार असल्याचे वेदिका पेडणेकर हिने सांगितले. या यशात आई-वडिलांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे वेदिका हिने सांगितले. महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत शेेदुलकर, सचिव विलास गुडेकर, माजी सिंधुदुर्ग कुंभार समाज जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर, पत्रकार दिलीप हिंदळेकर यांनी वेदिका पेडणेकरचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.