भाजपची महाजनादेश यात्रा १७ सप्टेंबर रोजी कणकवलीत

296
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहीर सभा

कणकवली, ता.९ : भाजपची महाजनादेश यात्रा १७ सप्टेंबर रोजी कणकवलीत येत आहे.या यात्रेच्या निमिताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.भाजप कार्यलयासमोर होणाऱ्या या सभेच्या जागेची भाजप नेते संदेश पारकर व पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी पहाणी केली.
यावेळी पोलीस कर्मचारी अभिजित तावडे,बबलू सावंत,युवा मोर्चाचे अध्यक्ष पप्पू पुजारे,समर्थ राणे,बाळा पाटिल,सदा चव्हाण,वैभव मालंडकर,मयूर चव्हाण आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवलीत होत आलेल्या महाजनादेश यात्रेच्या तयारीसाठी भाजप नेत्याकडून तसेच पदाधिकाऱ्याकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे.सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेवून हि जागा निवडली असून पार्किंग व्यवस्था उपजिल्हा रुग्णलायच्या मागील बाजूस करण्यात येणार आहे.अशी माहिती युवा नेते संदेश पारकर यांनी दिली.

\