अमेरिकेतून “सेल्फी विथ गणपती बाप्पा” स्पर्धेला प्रतिसाद…

280
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.०९: आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवण तालुक्यात आयोजित केलेल्या ‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’ स्पर्धेत अमेरिकेतील सोनिया रत्नाकर सुकी यांनी सहभाग घेतला आहे.त्यांचे मूळगाव कुडाळ असून सध्या त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
अमेरिकेतील त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पा सोबत त्यांनी आपल्या कुटुंबाचा सेल्फी फोटो काढून स्पर्धेसाठी पाठवला आहे.त्यामुळे श्री.नाईक यांच्या संकल्पनेतील या सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धेला सिंधुदुर्गबरोबरच अमेरिका देशातून प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाबरोबर सर्वच जण सेल्फी घेतात.गणपती बाप्पाबरोबर लोकांना असलेले हे सेल्फीप्रेम लक्षात घेऊन श्री. नाईक यांनी हि स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.तरुण, तरुणींबरोबर ,महिला, वयस्कर व्यक्ती देखील आपला सेल्फी फोटो स्पर्धेसाठी पाठवत आहेत.अनंत चतुर्दशी पर्यत हि स्पर्धा सुरु रहाणार असून कुडाळ मालवण मधील स्पर्धकांनी सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४२२९७१८७१ या व्हाट्सअँप नंबर वर गणपती बाप्पा सोबतचा आपला सेल्फी फोटो व स्पर्धकाचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पाठवावा.

\