Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरेल...

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरेल…

चाकूरकर, देसाई यांची माहीती: दोन वर्षात नव्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील…

सावंतवाडी ता.०९: येथे उभारण्यात येणारे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल रूग्णासाठी वरदान ठरेल.एकाच क्षताखाली अनेक उपचार होणार असल्यामुळे भविष्यात उपचारासाठी अन्य ठीकाणी जावे लागणार नाही.येत्या दोन वर्षात नव्या इमारतीचे काम पुर्ण होईल असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर व सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी आज येथे केला.सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन उद्या होत आहे.या पार्श्वभूमीवर दोघांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे नगरपालिका आरोग्य सभापती बाबू कुडतरकर,रुग्णालय अधीक्षक उत्तम पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर,प्रणिल पोकळे आदी उपस्थित होते.उदया सकाळी ११ वाजता हे भूमिपूजन होत आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,पालक मंत्री दीपक केसरकर तसेच सार्वजनिक आरोग्य परिवहन राज्य उत्पादन शुल्क राज्य मंत्री विजयकुमार देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ते पुढे म्हणाले हॉस्पिटल साठी ३६ कोटी ५६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून हॉस्पिटल दोन वर्षात उभे राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्री।चाकूरकर यांनी दिली.
श्री चाकूरकर म्हणाले, येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पंचावन्न गुंठ्यात उभे राहणारे हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल तळमजला सह तीन मजली असणार आहे शिवाय अजून दोन मजली इमारत वाढवता येणार अशी तरतूदही करण्यात येणार आहे एकूण शंभर खाटांचे हे हॉस्पिटल उभे राहणार आहे .
ते पुढे म्हणाले या हॉस्पिटलमध्ये तळमजल्यावर कार्डिओलॉजी सर्जरी पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी व निरो सर्जरी दुसऱ्या मजल्यावर नेफ्रोलॉजी व युरॉलॉजी तर तिसऱ्या मजल्यावर कॅन्सरचे उपचार होणार आहेत तसेच सिटीस्कॅन मशिन, एम आर आय, सोनोग्राफी, कलर डॉपलर, टूडी एको, स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल, ऑटो ब्लड गॅस अॅनालायझर, ऑटोमॅटिक ब्लड केमिस्ट्री, ऑटोमॅटिक ब्लड सेल काउंटर, इलेक्ट्रोलाईट अॅनालायझर, मॅमोग्राफी, डिजिटल एक्स-रे, मोड्युलर आयसीयू,मोड्यूलर ऑपरेशन थिएटर आदी वैद्यकीय उपकरणे बसवण्यात येणार आहेत तर एकूण 367 कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती असणार आहे यामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह वर्ग-1 चे 11 संवर्गाचे स्पेशालिस्ट डॉक्टर, वर्ग 2 चे 43 संवर्गाचे स्पेशालिस्ट डॉक्टर, वर्ग-3चे 143 कर्मचारी तर वर्ग-4 चे 134 गट ड कर्मचारी असणार आहेत.
या भूमिपूजन सोहळ्याला खासदार नारायण राणे विनायक राऊत, आमदार बाळाराम पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिल तटकरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी, के मंजू लक्ष्मी, मुंबई आरोग्य सेवा संचालक श्रीमती साधना तायडे, कोल्हापूर आरोग्यसेवा उपसंचालक डॉ नितीन बिलोलीकर, पुणे आरोग्यसेवा संचालक अर्चना पाटील रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी अभिनय या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून ते उपस्थित राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments