कणकवली समर्थनगर येथील विहिरीत अज्ञाताचा मृतदेह…

177
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१५ : शहरातील समर्थनगर येथील विहिरीत आज अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत तेथील जमीन मालक संजय गणेश हरगे यांनी आज पोलिसांत खबर दिली. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास समर्थनगर येथील श्री.हरगे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये सकाळी साडे नऊच्या सुमारास काही कामगार पाणी आणण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी त्‍यांना पुरूष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह उपजिल्‍हा रूग्‍णालयातील शवागरात पाठवण्यात आला. हा मृतदेह ४० ते ४५ वयोगटातील तरूणाचा आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नाही. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत

\