सर्व अधिकाऱ्यांची यंत्रणा सतर्क ठेवा…

57
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीक्षांत देशपांडे; मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक…

कणकवली, ता. १५ : मान्सूनपूर्व वादळी वारे, पाऊस तसेच पावसाळा सुरू झाल्‍यानंतर पूर, रस्ते वाहतूक ठप्प होणे व इतर संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व खात्‍याच्या अधिकाऱ्यांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवा, असे आवाहन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.येथील तहसील कार्यालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभु, लघु पाटबंधारेचे उपविभागिय अभियंता मंगेश माणगांवकर, संतोष शिरोडकर, महेश हिरेगोंडर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अतुल शिवणीवार, महावितरणचे उपविभागिय अभियंता विलास बगडे, एस.टी. विभागाचे कणकवली आगार व्यवस्थापक आ. द. गायकवाड तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तहसिलदार कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून हा कक्ष १ जूनपासून सुरू असणार आहे. या कक्षाचा ९४२२७४६९०६ असा संपर्क क्रमांक असून काही समस्या निर्माण झाल्यास येथे तातडीने संपर्क साधावा. तसेच तहसील कार्यालयातील सॅटेलाईट फोन यंत्रणासही सुसज्ज करण्यात आली आहे. फोंडाघाट व गगनबावडा घाटात दरड कोसळण्यासारख्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आपतकालीन यंत्रणा जेसीबीसहीत सतर्क ठेवावी. तसेच त्यांचे फोन नंबर प्रशासनाकडे द्यावेत, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या.

\