बांदा,ता.१५: वाफोली गावाचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान येथे महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले. तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या निसर्गरम्य व विलोभनीय परिसरात श्री देवी माऊली मंदिर, लिंग मंदिर, वेताळ मंदिर तसेच म्हारींगण मंदिरे आहेत. सुसज्ज प्रवेशद्वारामुळे मंदिराच्या सुशोभीकरणात भर पडली आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विलास गवस, देवस्थान प्रमुख हरी गवस, शिवाजी गवस, उद्घाटक महेंद्र गवस, उमाजी गवस, मारुती गवस, सरपंच उमेश शिरोडकर, आना गवस, अंकुश गवस, बबन गवस, मंथन गवस, सतीश गवस, राजन गवस, अनिल आ. गवस, पुरोहित श्रीकांत पेळपकर, महेश गवस, अनिल बा. गवस, भोरू गवस, मंगलदास गवस, अनिल गवस आदी मानकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.