बांदा उड्डाणपुलाच्या रस्ता प्रश्नी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष…

78
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाळा आकेरकर; लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन…

बांदा,ता.१५: येथील उड्डाणपुलाच्या रस्ता प्रश्नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्याची माहिती भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर यांनी दिली आहे.

बांदा येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून अरुंद सेवा रस्त्यामुळे ठेकेदार व अधिकारी यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ दिवसात यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला आहे. मात्र याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही.

यासंदर्भात श्री आकेरकर यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्या सचिवांशी चर्चा करत यासंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली आहे. निवडणूक पार पडल्यानंतर तात्काळ याविषयी सविस्तर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून देण्यात आल्याचे श्री आकेरकर यांनी सांगितले.

\