मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी केरवाडा येथील एकावर गुन्हा दाखल…

361
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: साटेली येथील दुचाकी चालक रमेश विष्णू सावंत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी केरवाडा येथील एकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुनील पडवळ ( रा. केरवाडा-वरचीवाडी ) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सातार्डा येथे झाला होता. यात सावंत हे जखमी झाले होते. त्यांच्यावर गोव्यात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले होते. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\