बांदा,ता.१५: इन्सुली-डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली-डोबाशेळ येथील राऊळ यांनी आपल्या मालकीची ड्रिम युगा दुचाकी आपल्या घराशेजारी लावली होती. दरम्यान सकाळी उठून पाहिली असता ती लावलेल्या ठिकाणी नसल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी बांदा पोलीसात तक्रार दिली असून सुमारे ४० हजार किमतीची दुचाकी चोरून नेण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहे.