राम गणेश गडकरी स्मृतिदिनानिमित्त अष्टपैलू कलानिकेतन संस्थेचे आयोजन…
मालवण, ता. १५ : कै. रामगणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेच्यावतीने काल रात्री भरड दत्तमंदिर येथे आयोजित सावेश साभिनय नाट्यगीत स्पर्धेत बालगटात कनक काळोजी, कुमार गटात प्राजक्ता ठाकूरदेसाई तर खुल्या गटात कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेस जिल्हा भरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सुनील परुळेकर, ज्येष्ठ हार्मोनियम वादक सतीश शेजवलकर, परीक्षक संजय धुपकर, केशव पणशीकर, ॲड. दिलीप ठाकूर यांच्यासह अष्टपैलू कलानिकेतन संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा – बालगट- द्वितीय – प्रांजल तेरसे, तृतीय- श्लोक सामंत, उत्तेजनार्थ- मृण्मयी आरोलकर, ज्ञानेश्वरी तांडेल, आराध्य खोत. कुमार गट- द्वितीय- आर्या आजगावकर, तृतीय- वेदिका लुडबे, उत्तेजनार्थ- भूमी नाबर, दीक्षा काकतकर, सानिका मेस्त्री, खुला गट- द्वितीय- गौरी पारकर, तृतीय- मीनाक्षी मेस्त्री, उत्तेजनार्थ- श्वेता यादव, गरिमा काजरेकर, गायत्री आरोलकर.
सर्व स्पर्धकांना बुवा भालचंद्र केळुसकर, सुधीर गोसावी यांनी संगीत साथ दिली. संस्थेच्या वतीने सुजाता शेलटकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे निवेदन सुधीर कुर्ले यांनी केले तर बाळू काजरेकर यांनी आभार मानले.