आचरा जिल्हा परिषद मतदार संघात स्वाभिमानला खिंडार

607
2
Google search engine
Google search engine

पळसंब सरपंच उपसरपंचासह त्रिंबक उपसरपंच शिवसेनेत

आचरा, ता. ९ : आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच पुजा मुणगेकर यांच्यासह पळसंब ग्रामपंचायतीचे दोन सदस्य तसेच त्रिंबक ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत बागवे यांनी आज दुपारी पळसंब येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने आचरा जिल्हा परिषद मतदार संघात स्वाभिमानच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आहे.
स्वाभिमानची सत्ता असलेल्या पळसंब ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचासह सदस्य प्रणिता पुजारे व सीमा चव्हाण या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी त्रिंबक उपसरपंचासह उल्केश गावडे यांनी तर बांदिवडे पाळयेवाडीतील काही ग्रामस्थांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.