बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर…

186
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ९ : बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्यावतीने तालुकास्तरीय धरणे आंदोलनानिमित्त येथील नायब तहसीलदार सुहास खडपकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भालचंद्र जाधव, विलास जाधव आदी उपस्थित होते. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्यावतीने तथागत गौतम बुद्ध व सम्राट अशोक मौर्याचा वारसा जपण्यासाठी राज्यस्तरीय चरणबद्ध आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर धरणे आंदोलन तसेच तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा देश जगात बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्धांचा इतिहास सांगणारे स्तुप, शिलालेख, लेणी, विहार, हे या देशातील ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. परंतु या देशातील काही विध्वंसक प्रवृत्ती या वास्तू नष्ट करीत आहेत. ही बाब देशासाठी खेदजनक आहे. शासनाने या वाईट प्रवृत्तींकडे जातीने लक्ष देऊन बुद्धांचा इतिहास जपण्यासाठी व नष्ट न होण्यासाठी उपाययोजना करावी असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १५ सप्टेंबरला ३६ जिल्ह्याच्या मुख्यालयावर रॅली प्रदर्शन आंदोलन तसेच तिसऱ्या टप्प्यात शेगाव येथे १८ सप्टेंबरला राज्यस्तरीय संमेलन होणार आहे.

\