गंभीर जखमी:अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीत हलविले…
माणगाव/मिलिंद धुरी ता.०९: उपवडे येथे स्थिरावलेल्या गव्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्या वर हल्ला केला आहे.या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.हा प्रकार आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.सुभाष यशवंत शेडगे असे त्यांचे नाव आहे.
त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की ,आपल्या शेतात काम करण्यासाठी श्री.शेडगे सायंकाळी शेताच्या बांधावरून जात होत. यावेळी मागाहून येणाऱ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांच्या छातीला,पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.याबाबतची माहिती उपवडेचे सरपंच संतोष राऊळ यांनी दिली.अशाप्रकारे दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांतून चिंतेचे वातावरण आहे.