कोकणात प्रथमच कुडाळ- मालवणमधील दिव्यांगांना होणार स्कुटरचे वाटप…

2

आम. वैभव नाईक यांचे प्रयत्न…

मालवण, ता. १० : प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक सामान्य व्यक्तीला व्हायला हवा. यासाठी आमदार वैभव नाईक हे नेहमी झटत असतात. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर दिव्यांगांनाही सक्षम करण्यासाठी आमदार नाईक यांनी (२०१९-२०) आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख ६४ हजार रुपयांचा निधी दिव्यांग व्यक्तींना स्कुटर वाटपासाठी देण्याची शिफारस नियोजन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार श्री. मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून याला मान्यता दिली आहे. दिव्यांग व्यक्तीना स्वयंचलित स्कुटर देण्यासाठी प्रत्येकी ७६ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. कुडाळ- मालवण मधील एकूण १४ लाभार्थ्यांना लवकरच या स्कुटरचे वाटप केले जाणार आहे.
आमदार स्थानिक विकासनिधीतून दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभासाठी केवळ १५ हजार देण्याची अट होती. मात्र आमदार वैभव नाईक यांच्या मागणीवरुन ही अट शिथिल करण्यात आली असून विशेष बाब म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी वैयक्तीक लाभाच्या १४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये शरद विलास जोशी (धुरीवाडा मालवण), सुजाता विश्राम वायंगणकर (पावशी मिटाक्याचीवाडी), सीताराम लक्ष्मण पेडणेकर (कुंदे भटवाडी), चंद्रसेन रामचंद्र धुरी (राठिवडे मालवण), प्रीतम सीताराम माधव (माणगाव बेनवाडी), संजय श्रीधर साळकर (हडी मालवण), अक्षय सुनील भोसले (मेढा राजकोट), रामचंद्र यशवंत वेंगुर्लेकर (ओरोस देऊळवाडी), अरुण समाजी पाटकर (वडाचापाट), राघवेंद्र शिवराम मुळीक (मसुरे), विठोबा सहदेव सुद (घोटगे), व्यंकटेश नारायण ठाकूर (मसुरे डागमोडे), शिवराम बाबुराव सावंत (माणगाव), तुषार आवाजी सावंत (भरणी) यांना प्रत्येकी ७६ हजार रुप्यांच्या स्वयंचलित स्कुटरचे वाटप करण्यात येणार आहे.

7

4