कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्यावतीने रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी स.१० वा. शारदा वाचनालय, कसाल येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी मागील वर्षभरात कोइप. सिंधुदुर्ग शाखेने केलेले कार्य, कोइपचे १० वे राष्ट्रीय जव्हार येथील आगामी अधिवेशन, स्थानिक इतिहासाचे संशोधन व सभासद नोंदणी यावर चर्चा होणार आहे.
या बैठकीला कोइपचे कार्यवाह, इतिहास संशोधक व लेखक मा.सदाशिव टेटविलकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील इतिहास प्राद्यापक, शिक्षक, इतिहास प्रेमी व अभ्यासक यांनी उपस्थित रहावे असे अवाहन कोइपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नारकर (9168341644) व उपाध्यक्ष प्रा.एस.एन,पाटील (9423300321) यांनी केले आहे.