खासदार विनायक राऊत यांचा नगराध्यक्ष साळगावकरांवर पलटवार…
सावंतवाडी ता.१०: आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री दीपक केसरकर निवडून येणारच आहेत,ही काळया दगडावरची रेघ आहे.त्यासाठी वेगळया ज्योतीषाची आणी नवग्रहांची गरज नाही,असा टोला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात लगावला.काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी श्री.केसरकर यांच्या सोबत यापूर्वी मी होतो त्यामुळे ते मंत्री झाले होते.परंतू आता ते पुन्हा निवडून येणार नाहीत,त्याच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत,अशी टीका केली होती.त्या टीकेला साळगावकर यांचे नाव न घेता श्री.राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले काही झाले तरी पुन्हा केसरकर निवडुन येणार आहेत,त्या दृष्टीने आता पासुन आम्ही तयार आहोत.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,धनंजय चाकूरकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई,वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील,संजय पडते,नागेंद्र परब,डॉ. ज्ञानेश्वर दूरभाटकर,राजू मसुरकर,सुनील मोरजकर, अनारोजिन लोगो,बाबू कुडतरकर,रुची राऊत,अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.