निवडणुकीपूर्वी चिपी विमानतळावर नक्कीच विमान उतरेल…

454
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर ; रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी चार कोटींचा निधी…

सावंतवाडी ता.१०: आचारसंहिता लागली तरी निवडणुकीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नक्कीच विमान उतरेल,असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केला.सावंतवाडी,शिरोडा,वेंगुर्ला ,दोडामार्ग येथील रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी तर सावंतवाडी रुग्णालयातील आधुनिक उपकरणांसाठी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.असेही यावेळी बोलताना श्री.केसरकर यांनी सांगितले.येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा श्री.केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,धनंजय चाकूरकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई,वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील,संजय पडते,नागेंद्र परब,डॉ. ज्ञानेश्वर दूरभाटकर,राजू मसुरकर,सुनील मोरजकर, अनारोजिन लोगो,बाबू कुडतरकर,रुची राऊत,अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.