संजू परब यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पादुकांचे आगमन…

544
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आज सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या घरी आगमन झाले. यावेळी चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज नितीन पुजारी यांच्या उपस्थितीत श्री. परब यांनी स्वामींच्या पादुकांची विधिवत पूजा केली.
यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, स्वामींचे सेवक विजय पुजारी, सुदीप पुजारी, नयन पुजारी, राजू पुजारी, अनिल पुजारी, पुष्कर पुजारी, बसवराज पुजारी, मनोज कोकजे आदी उपस्थित होते.

\