Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबुद्ध धम्माचे आचरण केल्यास भावी पिढी घडेल

बुद्ध धम्माचे आचरण केल्यास भावी पिढी घडेल

धम्माचारी सिद्धार्थ जी; वैभववाडी येथे एकदिवसीय धम्मपरिचय शिबीर संपन्न

वैभववाडी.ता,१०: आज संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्म पोहचला आहे. बुद्ध धम्म समजून घेऊन त्यानुसार आचरण केल्यास सुसंस्कृत भावी पिढी घडेल. असे प्रतिपादन धम्माचारी सिद्धार्थ जी, सांगली यांनी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण आयोजित एक दिवसीय धम्मपरिचय शिबीरात केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण यांच्या वतीने शनिवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे एकदिवसीय धम्मपरिचय शिबीर संपन्न झाले.
शिबिराचे उदघाटन कार्याध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले तर प्रास्तविक सरचिटणीस रवींद्र पवार यांनी केले. यावेळी अमर कदम, चंदन जाधव, प्रफुल्ल जाधव, रुचिता कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरात राजेंद्र कांबळे, धर्मरक्षित जाधव,चंद्रकांत जाधव, धोंडीराम तांबे, रुपेश कांबळे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव शरद कांबळे यांनी केले.

फोटो- वैभववाडी येथे धम्म परिचय शिबीरात सहभागी झालेले कार्यकर्ते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments