राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर अमित सामंत यांची निवड

2

कुडाळ ता.१०: विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या तडकाफडकी हकालपट्टी नंतर रिक्त असलेल्या राष्ट्रवादीला हक्काचा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.आज अखेर या पदावर युवानेते अमित सामंत यांची निवड करण्यात आली.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.याठिकाणी नेमकी कोणाची निवड होईल याबाबत तर्कवितर्क होते.यात त्यांच्यासह माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,नगरसेवक आबिद नाईक यांच्या नावाची चर्चा होती.मात्र आज याठिकाणी श्री सामंत यांचे नाव अंतिम करण्यात आले.
श्री सामंत हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीत क्रियाशील कार्यकर्ते आहेत.त्यांनी आपल्या माध्यमातून पक्षसंघटना आणि विशेषता युवक संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या या निवडीमुळे त्याचा फायदा पक्षाला होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

1

4