शिवडाव बौद्धवाडीत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, आंबेडकर यांची संयुक्त जयंती…

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण,ता.२२: सम्यक समाज प्रबोधिनी शिवडाव बौद्धवाडी यांच्या माध्यमातुन भारतीय बौद्ध महासभा मुंबई, गाव शाखा शिवडाव तसेच शिवडाव बौद्ध विकास संघ मुंबई, गाव शाखा शिवडाव यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सयुक्त जयंती महोत्सव २२ मे आणि २३ मे रोजी शिवडाव बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येत आहे.
यात आज दुपारी ४ वाजता लहान मुला-मुलींचे, महिला- पुरुषांचे फनी गेम्स, ६.३० वाजता मिरवणूक, रात्री ९.३० वाजता स्नेहभोजन, १०.१५ वाजता जनरल सभा, २३ मे रोजी रात्री ७.३० वाजता अभिवादन सभा व बक्षीस वितरण समारंभ होईल.
रात्री १० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. यात विजेत्यांना रोख रक्कम, चषक, प्रशस्तीपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

\