सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता…

1555
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: रिझल्ट आणायला महाविद्यालयात जाते असे सांगून गेलेली तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संबंधित मुलगी २१ मे ला सकाळी साडेदहा वाजता घरातून बाहेर पडली होती. संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली. परंतु तिचा कोठेही ठावठिकाणा न लागल्याने तिच्या वडिलांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून शोध कार्य सुरू असून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ठाणे अंमलदार भरत जाधव यांनी सांगितले.

\