पत्नीच्या आजारपणाला कंटाळून देवगडात वृद्धाची आत्महत्या…

249
2
Google search engine
Google search engine
Google search engine

देवगड,ता.२२: साळशी-कुळ्याचीवाडी येथील शशिकांत नारायण साटम (वय ८५) यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आपल्या पत्नीच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी हा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शशिकांत साटम यांची पत्नी गेली ५ वर्ष पॅरालिसिसने आजारी आहे. तिचे सर्व अंथरूणातच होतात
त्यामुळे श्री साटम यांना नैराश्य आले होते यातून कंटाळल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या घरी ते दोघे पती-पत्नीच एकटेच राहत होते. या घटनेची माहिती पोलीस पाटील कामिनी नाईक यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक करत आहे.

\