गावडें विधानसभेवर गेल्यास महीला व बेरोजगारांना न्याय मिळेल

211
2
Google search engine
Google search engine
Google search engine

छाया भाईप:विविध महीला सहकारी संस्थातर्फे गौरव

वेंगुर्ल.ता,१०:  गेेल्या २० वर्षाच्या काळात सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेले व सहकाराचे गाढे अभ्यासक एम. के. गावडे यांनी शासनाच्या विविध योजनांतून केवळ महिलांना नव्हे तर नवोदित बरोजगार युवकांनाहि स्वयंरोजगार देण्याचे व त्यातून रोजगार वाढविण्याचे काम केले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काथ्या व्यवसायातून महिलांना स्वयंरोजगार व घरबसल्या रोजगार देण्याचे काम केले आहे. असे गुरूसमान व मार्गदर्शक असलेले एम. के. गावडे हे विधानसभेवर गेल्यास खऱ्याअर्थाने या जिल्ह्यातील महिलांना व बेरोजगार युवकांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन महिला काथ्या संस्थेच्या चेअरमन छाया भाईप यांनी आयोजीत कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्गातील विविध महिला संस्था व इतर सहकारी संस्थांच्यावतीने सहकाराच्या माध्यमातून महिला व युवकांचा विकास गेल्या १५ वर्षात साधण्यास मार्गदर्शन ठरलेले राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांचा गौरव सोहळा येथील महिला काथा प्रकल्पाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत महिला काथ्या सहकारी संस्थेच्या चेअरमन छाया भाईप, शैला अरविंदेकर, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, निलम औद्योगिक सहकारी संस्था सावंतवाडीच्या चेअरमन गीता परब, सनशाईन कॉयर क्लस्टर, मळेवाडच्या सचिव श्रुती रेडकर, सुर्यकांता फळप्रक्रिया संस्था, वेतोरेच्या चेअरमन माधवी गावडे, सनशाईन कॉयर सहकारी संस्थेच्या अध्यक्षा राखी करंगुटकर, सुरंगी माfहला औद्योगीक संस्थेच्या चेअरमन सुजाता देसाई, सावित्रीबाई फुले सहकारी संस्थेच्या चेअरमन प्रवीणा खानोलकर, गुरूदेव मजुर सहकारी संस्थेचे चेअरमन अर्जुन परब, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, नवयुग महीला संस्थेच्या संचालक सुजाता मोरजकर, साक्षी गडेकर, स्नेहा गडेकर आदींचा समावेश होता.
यावेळी कांहि जणांनी काथ्या व्यवसाय व अन्य व्यवसायच्या केवळ घोषणा केल्यापण प्रत्यक्षात या व्यवसायाचे मार्गदर्शन व शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या प्रत्येक खात्याकडे, बँकांकडे कामे कशी करून घ्यावीत याचे सहकार्य देणारी एम. के. गावडे हिच एकमेव व्यक्ती आहे. काथ्या, काजु, फळप्रक्रिया, नारळाचे झाडावर चढण्याच्या शिड्या, आदी व्यवसायांतून महिला व युवकांना आपला वेळ देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात किमान एक लाख लिटर दुध संकलनात जिल्हाला उभारी देण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांना सोबत घेण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे एम. के. गावडे यांनी विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून मिळाल्यास त्यांच्या पाठीशी ठाम राहून या मतदार संघातील ५४ टक्के महिला मतदारांच्या माध्यमातून आम्ही सर्व जणी त्यांच्या पाठिशी राहू. या जिल्ह्याचा आर्थिक विकास हा निश्चीतच होईल असे मार्गदर्शन व्यासपिठावरील विविध संस्थांच्या महिलांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्रुती रेडकर तर आभार प्रज्ञा परब यांनी मानले.

\