सावंतवाडीत उद्या ओंकार कलामंचचा बहारदार कार्यक्रम…

2

गणेशोत्सवा निमित्त बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने आयोजन…

सावंतवाडी ता.१०: येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात गणेशोत्सवा निमित्त बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने उद्या दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता ओंकार कलामंच,सावंतवाडी यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात गणेश वंदना,लोकनृत्य,वेस्टन डान्स,देखावे,लावणी तसेच विनोदी नाटीकांचा कलाविष्कार सादर होणार आहे.
हा कार्यक्रम पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रायोजित केला आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बिद्रे व राजन पोकळे यांनी केले आहे.

14

4