सावंतवाडीत १३ ला रक्तदान व आरोग्य शिबीर…

195
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता, १०: येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यांच्यावतीने लायन्स व लायनेस क्लब सावंतवाडी आणि युवा सिंधू फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ सप्टेंबरला रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९. ३० वाजता होणार आहे.आरोग्य शिबिरासाठी डॉ . चेतन घोरपडे (एम. एस् ) नाक,कान,घसा तज्ञ.
डॉ .पूजा घोरपडे (एम्.डी ), स्त्रीरोग, वंधत्व तज्ञ आय व्ही एफ ( एनयुएच्, सिंगापूर) डॉ अमित बुरांडे ( एम्.एस्,) अस्थितज्ञ.डॉ .मिता बुरांडे ( एम्.डी,) डायबेटिक तज्ञ आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी सागर नाणोसकर९४२३३०९१६६
अशोक देसाई: ९४२२३७३३८६
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.प्रशांत कोठावळे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

\