कणकवली, वैभववाडी, देवगडात ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होणार

160
2
Google search engine
Google search engine

आमदार नितेश राणे यांची माहिती; जिल्हयातील युवक, युवतींना मोफ़त प्रवेश

कणकवली, ता.११ : सिंधुदुर्ग मधील युवक युवतींनाही प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी यासाठी कणकवली, वैभववाडी आणि देवगड येथे ऑक्टोबर 2019 पासून ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करत असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. या केंद्रात जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असणार आहे. आज पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करणात आली आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मार्गदर्शन केंद्र सुरू होईल. कणकवलीतील केंद्र हरकुळ बुद्रुक अभियांत्रिकी महाविद्यालयात, देवगडातील केंद्र वॅक्स म्युझियम तिसरा मजला आणि वैभववाडीतील केंद्र महाराणा प्रताप स्मारकामधील सांस्कृतिक सभागृहात होणार आहेत.
येथील प्रहार भवन मध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ड्रीम फौंडेशनचे सुशीलकुमार अहिरराव, अनिल गवळी, स्पर्धा केंद्राचे जिल्हा समन्वयक गणेश काटकर आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, प्रशासकीय नोकऱयांमध्ये सिंधुदुर्गातील मुले मागे पडतात, तर बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना कोकणाबद्दल आस्था नसते. त्यामुळे कोकण विकासात मागे पडत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही पूर्णतः मोफत असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करत आहोत. या केंद्रात 30 तज्ञ मार्गदर्शकांची टीम असणार आहे. या खेरीज 8 त्या त्या विषयातील लेखक, अभ्यासक, अधिकारी येऊन मार्गदर्शन करणार आहेत.
ऑक्टोबर 2019 च्या पहिल्या आठवड्यापासून तिन्ही स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू होतील. तर मार्च अखेरपर्यंत केंद्र सुरू राहणार आहे. त्यानंतर upsc, mpsc परीक्षा सुरू होणार आहेत.