वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा दावा:विशेषतः कोकणातील ग्राहकांना बसणार फटका
मुंबई.ता,११: गेल्या काही दिवसापासून ३८ हजाराच्या घरात गेलेले सोने या वर्ष अखेर पन्नाशी गाठण्याची शक्यता आहे.
तशी शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिल कडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणा-या सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पाळणार आहे.विशेषतः याचा फटका कोकणाला बसणार आहे.
सोन्याने गेल्या काही वर्षात उच्चांकी भरारी घेतली आहे. सदस्य सोने ३८ हजार रुपये तोळा असे आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत आहेत.आता काही दिवसांनी हा दर ४० हजारापर्यंत जाण्याची शक्यता ग्राहकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता गोल्ड कौन्सिलने सोने येत्या वर्षभरात पन्नास हजारापर्यंत जाईल असा दावा केला आहे.