Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवणात रिक्षा व्यावसायिकाचा असाही प्रामाणिकपणा...

मालवणात रिक्षा व्यावसायिकाचा असाही प्रामाणिकपणा…

 

मालवण, ता. २६ : शहरात कुटुंबियांसमवेत रिक्षातून प्रवास करताना एक युवती आपली पर्स रिक्षातच विसरल्यानंतर मोबाईल व रोख रक्कमेचा समावेश असणारी ही पर्स शहरातील बांगीवाडा येथील रिक्षाचालक सईद अयुब बांगी यांनी इतर मित्रमंडळींच्या सहकार्याने त्या युवतीला परत केली. रिक्षाचालक बांगी यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईस्थित रेवतळे येथील मुळ रहिवासी असलेले रणजित मडये हे सध्या आपल्या कुटुंबियांसमवेत मालवणात आले आहेत. कामाच्या निमित्ताने शहरात फिरत असताना काल रात्री मालवण बाजारपेठ येथील सकपाळ नाका येथून रिक्षात बसून ते रेवतळे येथे गेले. रिक्षातून उतरल्यावर त्यांची मुलगी शर्वरी मडये हिची पर्स रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र रिक्षा निघून गेल्याने त्यांनी याबाबत मालवणातील आपल्या मित्रमंडळींना माहिती देत रिक्षाचा शोध सुरु केला. रणजित मडये यांचे मित्र पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी सकपाळ नाका येथे दिलीप वायंगणकर यांच्याकरवी रिक्षा चालकांकडे चौकशी केली.
आज दुपारी ज्या रिक्षात पर्स राहिली त्या रिक्षाचे चालक सईद बांगी यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी आपल्या रिक्षात शोधाशोध केली असता त्यांना ती पर्स सापडून आली. बांगी यांनी आज दुपारी भरड नाका येथे रिक्षाचालक विश्वास चव्हाण व तेथीलच फुल विक्रेते रुपेश हळदणकर यांच्याकडे ती सोपवली. त्यानंतर चव्हाण व हळदणकर यांनी मडये यांचे मित्र प्रफुल्ल देसाई यांना माहिती दिल्यानंतर श्री. मडये यांच्याशी संपर्क साधल्यावर रिक्षाचालक बांगी यांच्याकरवी ती पर्स मडये कुटुंबियांकडे स्वाधीन केली. मडये कुटुंबियांनी भरड नाका येथे रिक्षाचालक सईद बांगी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments