मुंबईचे माजी नगरसेवक बाळ नरे यांचे निधन…

119
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. २६ : मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मालवणचे सुपुत्र हरिश्चंद्र तानाजी उर्फ बाळ नरे (वय- ७८)यांचे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
रेवतळे येथील रहिवासी असणाऱ्या बाळ नरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. मालवणच्या टोपीवाला हायस्कुल मधून अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी मुंबई गाठून मुंबईत त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. बाळ नरे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून ओळख होती. मुंबई परेल शिवसेना शाखेचे ते १५ वर्षे शाखाप्रमुख होते याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेत त्यांनी परेल भागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले.
नऊ वर्षांपूर्वी ते अर्धांग वायुमुळे आजारी पडले. मालवणात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता मालवण रेवतळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

\