Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराष्ट्रवादी बबन साळगावकरांच्या कायम पाठीशी...

राष्ट्रवादी बबन साळगावकरांच्या कायम पाठीशी…

अमित सामंत: पक्ष वाढवण्यासाठी खारेपाटण ते दोडामार्ग दौरा करणार…

कुडाळ.ता,११: राष्ट्रवादीच्यावतीने सावंतवाडी विधानसभा मतदार संघ नक्कीच लढवला जाईल. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा आहे. आमचा विरोध हा व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे.अशी भूमिका राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन जिल्हाभरात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोडामार्ग ते खारेपाटण असा दौरा करण्यात येणार आहे.असे त्यांनी सांगितले.
श्री सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाळा कनयाळकर एम.के.गावडे, आत्माराम कवठणकर, भास्कर परब, संग्राम सावंत सावळाराम अणावकर, प्रफुल्ल सुद्रिक, पुंडलिक दळवी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments